पनवेल : रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये शनिवारी (दि. 11) रिसेन्ट ट्रेंड इन आयपीआर, कॉपीराइट्स व प्लाग्यारीझ्म या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
या चर्चासत्रासाठी सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बर्हाटे, मुंबई विद्यापीठातील जवाहरलाल नेहरू नॉलेज रिसोर्स सेंटरचे डायरेक्टर प्रा. भुजंगराव अहिरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत, तसेच या चर्चासत्राचे बीजभाषण नागपूर विद्यापीठातील लायब्ररी सायन्सच्या प्राध्यापिका डॉ. मंगला हिरवाडे करणार आहेत. चर्चासत्रात मुंबईच्या एसएनडीटी विद्यापीठाचे डेप्युटी लायब्ररियन डॉ. विलास जाधव, पुणे मॉडर्न कॉलेजच्या लायब्ररियन डॉ. शांताश्री सेनगुप्ता यांची व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर यांच्या मार्गदर्शन व प्रेरणेतून होणार्या या एकदिवसीय चर्चासत्रात राज्यातून अनेक संशोधक प्राध्यापक आपले शोधनिबंध सादर करणार आहेत. महाविद्यालयाच्या आयक्यूएसी सेलचे चेअरमन प्रा. सोपान गोवे व महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. सुनील अवचिते यांनी चर्चासत्र आयोजनासाठी परिश्रम घेतले. चर्चासत्रात माजी विद्यार्थ्यांनी तसेच चर्चासत्रामध्ये चर्चिल्या जाणार्या विषयांमध्ये रुची असणार्या संबंधित व्यक्तींनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.