Breaking News

आडघरचा छावा क्रिकेट संघास अंतिम विजेतेपद

माणगाव ः प्रतिनिधी
लहाने सुरव येथील मर्यादित षटकांच्या टेनिस ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेत आडघरचा छावा क्रिकेट संघाने अंतिम सामन्यात जय महाराष्ट्र क्रिकेट क्लब कोशिंबळे संघावर मात करीत अंतिम विजेतेपद मिळवून प्रथम क्रमांकाचे बक्षीस 10 हजार  रुपये व आकर्षक चषक पटकावला. येथील एकता ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या वतीने कोयना वसाहत रोहीनेतर्फे ही स्पर्धा घेण्यात आली.
लहाने सुरव येथील मैदानावर रविवार (दि. 2) स्पर्धा उत्साहात पार पडली. स्पर्धेतील उपविजेत्या जय महाराष्ट्र क्रिकेट क्लब कोशिंबळे संघाला 7 हजार रुपये व आकर्षक चषक, तृतीय क्रमांकाचे विजेते कमांडर क्रिकेट क्लब बामणोली संघास 5 हजार रुपये व आकर्षक चषक व चतुर्थ क्रमांकाचे विजेते श्री समर्थ कृपा लहाने सुरव संघास 3 हजार रुपये व आकर्षक चषक देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज म्हणून जय महाराष्ट्र क्रिकेट क्लब कोशिंबळे संघाचा खेळाडू अमर पाष्टे, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून आडघरचा छावा संघाचा खेळाडू चैतन्य दसवते, तर मालिकावीराचा बहुमान जय महाराष्ट्र क्रिकेट क्लब कोशिंबळे संघाचा अष्टपैलू खेळाडू शैलेश बक्कम यांनी पटकावला.
सदर स्पर्धेच्या उद्घाटन व बक्षीस वितरण समारंभासाठी सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण, अनंत कदम, भिकाजी सुतार, सुरेश कदम, राजू सुर्वे, असोसिएशनचे कार्याध्यक्ष  राहुल दसवते, अध्यक्ष वैभव मोरे, माजी अध्यक्ष मच्छिंद्र म्हस्के, संतोष दसवते, विवेक जाधव, निलेश उभारे, कौस्तुभ पवार आदी उपस्थित होते.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply