पेण : प्रतिनिधी
शासनाच्या रमाई आवास योजनेअंतर्गत 2018-19 मध्ये पेण नगर परिषद हद्दीतील घरकुल मंजूर केलेले लाभार्थी कैलास जनार्दन जाधव व सुनिल हरिश्चंद्र पंते यांना नगराध्यक्षा प्रितम पाटील यांच्या हस्ते एक लाख 25 हजार रूपयांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. उपनगराध्यक्षा वैशाली कडू, मुख्याधिकारी अर्चना दिवे, गटनेते अनिरूद्ध पाटील, सभापती दर्शन बाफना, नगरसेविका शहेनाज मुजावर, नलिनी पवार, देवता साकोस्कर, भाजप शहर उपाध्यक्ष अजय क्षिरसागर, माजी सभापती प्रकाश पाटील, धनश्री समेळ, कुणाल नाईक आदी यावेळी उपस्थित होते.