Tuesday , February 7 2023

धामणपाड्यातील क्रिकेट स्पर्धेत वादळ शहाबाजचे सुयश

श्रीगाव : प्रतिनिधी
अलिबाग तालुक्यातील धामणपाडा येथे रविवारी (दि. 2) विहार इलेव्हन क्रिकेट क्लब धामणपाडा यांच्या वतीने व पोयनाड शहाबाज पंचक्रोशी क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन शहाबाज ग्रामपंचायत सरपंच धनंजय म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले. यात वादळ शहाबाज संघ अंतिम विजेता ठरला.
 त्यांना 10 हजार रुपए, द्वितीय क्रमांक झुंझार पोयनाड संघास सात हजार रुपये, तृतीय व चतुर्थ क्रमांक यजमान विहार इलेव्हन धामणपाडा व श्रीराम कमलपाडा यांना प्रत्येकी पाच हजार रुपए व विजयी संघांना चषक देऊन सन्मानित करण्यात आले तसेच स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज सौरभ पाटील (विहार धामणपाडा), उत्कृष्ट गोलंदाज चैतन्य (झुंझार पोयनाड), सामनावीर रसिक पाटील (शहाबाद), मालिकावीर महेश पाटील (शहाबाज), प्रेक्षक हीरो प्रसाद पाटील (धामणपाडा) यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

Check Also

भाजप नेते संजय भगत यांच्या वाढदिवसानिमित्त धान्यवाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप माथाडी ट्रान्सपोर्ट व सिक्युरिटी आणि महाराष्ट्र जनरल कामगार संघटना उपाध्यक्ष …

Leave a Reply