खांदा कॉलनी : रामप्रहर वृत्त
संजय भोपी सोशल क्लब (डखइडउ), अलर्ट सिटीझन फोरम खांदा (अउऋघ), मॉर्निंग योगा ग्रुप (चधॠ) यांच्या संयुक्त विद्यमाने खांदा कॉलनी क्रिकेट प्रीमियर लीग (40 +) क्रिकेटच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये रत्नदीप स्पोर्ट्स क्लब, धाकटा खांदा या संघाने 2018, 2019, 2020 या तीनही वर्षांत प्रथम क्रमांक मिळवून विजयी हॅट्ट्रिक केली.
या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज आनंद माळी, उत्कृष्ट गोलंदाज संदीप म्हात्रे, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण प्रवीण पाटील, अंतिम सामनावीर मनोहर म्हात्रे ठरले असून आयोजकांनी त्यांचे अभिनंदन केले.
Check Also
कर्जतमधील रायगड जिल्हा बँकेची शाखा जळून खाक
कर्जत : प्रतिनिधी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला रविवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास आग …