Breaking News

आश्रमशाळा विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत उदासीनता

आदिवासींच्या मुलांना शिक्षण मिळावे यासाठी शासनाने श्रामशाळा सुरू केल्या.  कोकणातही अशा आश्रमशाळा आहेत.  एकात्मिक आदिवासी प्रकल्प पेण मार्फत रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात एकूण 16 आदिवासी आश्रमशाळा चालविल्या जातात. ज्यात सुमारे 5 हजारहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. मात्र या आश्रम शाळांमध्ये शिकणार्या विद्यार्थ्यांच्या सुरकक्षेबात फार गांभीर्याने पाहिले जात नाही. एखादी घटना घडली की त्यावर चार्चा होते. लोक विसरून जाता. शासनही याकड फार गांभिर्याने पहात नाही.

रायगड जिल्ह्यातील दोन आश्रमशाळांमध्ये घडलेल्या गंभीर घटनांमुळे पुन्हा एकदार आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न चर्चेला आला आहे.  खरतर या समस्येच्या मुळाशी जाऊन त्यावर उपयायोजना करायला हवी.  पेण तालुक्यातील वरसई आश्रमशाळेत इयत्ता 10 वीत शिकणार्या विद्यार्थीनीने गळफास लाऊन आत्महत्या केली. दोन दिवस ती शाळेतून बेपत्ता होती. तीचा मृतदेह शाळेपासून तीन किलोमीटर अंतरावर जंगलात एका झाडावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. या प्रकरणाचा तपास सुरु आहे.वरसईची घटना ताजी असतांनाच  कर्जत तालुक्यातील भिलवली आश्रमशाळेतील विद्यार्थीनीने विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. जिल्ह्यात आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांबाबात अशा घटना यापुर्वीही घडल्या आहेत. दिड वर्षापुर्वी खालापूर तालुक्यातील डोलवली आश्रमशाळेतील 11 वर्षाच्या मुलीचा संशायास्पद मृत्यू झाला होता. तर भिलवली येथील आश्रमशाळेत यापुर्वीही अशीच घटना घडली होती. सातत्याने घडणार्या घटनामुळे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा चव्हाट्यावर आला आहे.आदिवासी आश्रम शाळांमध्ये शिकणार्या मुलींच्या सुरेक्षेबाबत नहेमीच चार्चा होत असते. परंतु त्याचवर उपायोजना मात्र केल्या जात नाहित.

आदिवासी आश्रमशाळांची दुरवस्था, मुलभुत सोयी सुविधांचा आभाव, कर्मचारी आणि अधिक्षकांची रिक्त पदे यासारख्या समस्या या गोष्टी नविन नाहीत. मात्र वांरवार पाठपुरावा करूनही याबाबत शासनस्तरावर दखल घेतली जात नाही.  विद्यार्थ्यामधील मानसिक ताणतणावांचे व्यवस्थापन या घटनांना कारणीभूत ठरत आहेत. 

आश्रमशाळांमधील पटसंख्या लक्षात घेऊन वर्ग खोल्यामध्ये वाढ करणे अथवा शाळांची संख्या वाढविणे, शाळांमधील नादुरुस्त सिसीटीव्ही यंत्रणांची तातडीने दुरुस्ती करणे, रात्रपाळीसाठी सुरक्षारक्षक नेमणे, पालक आणि शिक्षकांमधील संवाद वाढवणे यासारख्या उपाययोजना आवश्यक आहे. शासनाच्या नियमानुसार वस्तीशाळा, बालगृह आणि आश्रमशाळा यांचे दर तीन महिन्यांनी सुरक्षा ऑडीट होणे गरजेचे आहे. पण ते केले जात नाही.

  आदिवासी आश्रमशाळेतील मुले हि कुटूंबापासून दुरावलेले असतात. त्यामुळे बरेचरचदा अशा विद्यार्थ्यामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ शकते. दैनंदिन समस्या ते कोणाशी बोलून दाखवू शकत नाहीत. यामुळे ते स्वमग्न होत जातात. यातूनच नैराश्य निर्माण होते.  मानसिक तणाव सहन न झाल्याने ते टोकाचे पाऊल उचलतात.

आश्रमशाळांमध्ये राहणारे विद्यार्थी आपल्या कुटूंबापासून दूरावलेले असतात. त्यामुळे त्यांच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ शकते. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांची विशेष काळजी घेण गरजेच आहे. आवश्यकता भासल्यास मानसोपचार तज्ञांचा सल्ला घेणही आवश्यक आहे. पौगंडावस्थेतील मुलांना रागावर निंयत्रण ठेवता येत नाही. अशी पाऊल उचलली जाऊ शकतात. त्यामुळे त्यांचे मानसिक समुपदेशन करणे गरजेचे आहे.

डोगरात , जंगलांमध्ये राहणारा आदिवासी सामज शिक्षणापसून वंचित होता. त्यामुळे तो मुळ प्रवाहापासून दूर होता. या सामजाला मुळ प्रवाहासी जोडण्यासाठी त्यांना शैक्षणिक सुविधा मिळणे आवश्यक होते. त्यामुळे शासनाने अदिवासीसांठी आश्रम शाळा सुरू केल्या. येथे मुल शिवकता. तेथेच राहतात. आश्रम शाळा ही शासनाची सर्वात यशस्वी योजन आहे. या शाळांमुळेच आदिवासी सामजातील मुल – मुली शिकली. आज शासकीय सेवेमध्ये जे आदिवासी कर्मचारी व अधिकरी आहेत त्यातील बहुतांश लोकांनी आश्रमशाळांमध्येच शिक्षण घेतलेले आहे. त्यामुळे आश्रमशाळा ही योजना नक्कीच चांगली आहे. परंतु यात काळानुसार या आश्रमशाळांमध्ये शासनाने काही सुविधा द्ययाला हव्यात. विद्यार्थ्यांच्या सुरेक्षेसाठी या शाळांमध्ये कोणतीही सुविधा नसते. आश्रमशाळांच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेर बसवले पहिजे.  विद्यार्थ्याच्या सुरक्षेचे ऑडीट त्रयस्थ यंत्रणांमध्यमातून करणे आवश्यक आहे.  मुख्याध्यापक, अधिक्षक यांनी शाळेच्या परिसरात वास्तव्य केले पाहिजे पण अनेक मुख्याध्यापक आणि अधिक्षक शाळेच्या परिसरात राहत नाहीत. त्यांना शाळेच्या परिसारातच राहणे बंधनकारक केलजे पाहिजे. सर्वात महत्वच म्हणजे या आश्रमशाळांमध्ये शिकत असलेल्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनींची वेळेवेळी आरोग्यतपासणी व्हायालच हवी. ही मुल दिवाळी, मे महिना , गणेशोत्सव अशा सुट्यांच्या कालावधीत घरी जातात.  सुट्टी संपल्यानंतर जेव्हा ही मुल पुन्हा शाळेत येतात तेव्हा या सर्व विद्यार्थी तसेच विद्यार्थीनींची अरोग्यतपासणी केलीच पाहिजे. यातून बरेच पुढील धोक टळू शकतील. मुलांमधील मानसिक तणावाची कारणे अनेक असू शकतात. ते आपल्या पालकांना किंवा शिक्षकांना देखील सांगत नाहित. त्यामुळे त्यांचे समुपदेशन व्हायाला हवे. स्वमग्न विद्यार्थ्यांशी पालक आणि शिक्षकांनी त्यांच्याशी सतत संवाद करणे गरजेचे आहे. शासनाने आश्रमशाळांधील विद्यर्थ्यांच्या संरक्षणाच्या तसेच इतर सामस्यांबात उदारसीन धोरण सोडून या प्रश्नाकडे गांभिर्यान पाहिले पाहिजे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply