Breaking News

बेकरे गावातील दोन हातभट्ट्या उद्ध्वस्त

कर्जत : बातमीदार

नेरळ पोलीस ठाणे हद्दीमधील बेकरे गावात सुरू असलेल्या गावठी दारूच्या दोन हातभट्ट्या पोलिसांनी उद्ध्वस्त केल्या. एकाच आठवड्यात नेरळ पोलिसांनी तीन ठिकाणी गावठी दारूचे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत.

कर्जत तालुक्यातील बेकरे गावाच्या परिसरात गावठी दारू बनविली जात असल्याची खबर सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांना मिळाली होती. त्यानंतर उपनिरीक्षक रतीलाल तडवी आणि राम शिद यांनी अन्य पोलिसांसह बेकरे येथे जाऊन गावठी दारूचे अड्डे उद्ध्वस्त केले. त्यात कोला धबधबा परिसरात ओहोळाच्या बाजूला सुरू असलेल्या गावठी दारूच्या हातभट्टीचा समावेश आहे. या वेळी पोलिसांची चाहूल लागताच गावठी दारू बनविणारे जंगलात पळून गेले. या वेळी पोलिसांनी नवसागर गूळमिश्रित रसायन भरलेले पाच प्लास्टिक पिंपांमधील रसायन जमिनीवर ओतून टाकले, तसेच रबरी ट्यूबमध्ये भरलेले रसायन आणि दारू गाळण्याचे साहित्यदेखील फोडून टाकले. या कारवाईत 36,100 रुपयांचे गावठी दारू बनविण्याचे साहित्य जमीनदोस्त करण्यात आले. त्याचवेळी गावाच्या खांबाया मंदिर परिसरात पोलिसांनी धाड टाकली. तेथे सहा प्लास्टिक पिंपांत रसायन भरले होते. ते जमिनीवर ओतून पोलिसांनी प्लास्टिक पिंपे फोडून टाकली. तेथील दारू गाळण्याच्या टाक्यादेखील फोडून टाकण्यात आल्या. या कारवाईत  तब्बल 41,100 रुपयांचे साहित्य जमीनदोस्त करण्यात आले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply