Breaking News

‘सीएए’ समर्थनार्थ नेरळमध्ये भव्य रॅली

कर्जत : बातमीदार
नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या (सीएए) समर्थनार्थ नेरळमध्ये भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ लोक जागरण मंच यांच्या वतीने रविवारी (दि. 16) भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीत तिरंगा झेंडे हातात घेतलेले कार्यकर्ते आणि भगव्या टोप्या परिधान केलेले नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
भाजप तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर, प्रज्ञा प्रकोष्ठ कोकण संयोजक नितीन कांदळगावकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दिलीप कावडकर, श्रीहरी काळे, मनसेचे कर्जत तालुका अध्यक्ष अंकुश शेळके, शहर अध्यक्ष मिलिंद मिसाळ यांनी रॅलीसाठी निवेदन दिले होते. त्यानुसार नेरळच्या हनुमान मंदिर येथून ही रॅली निघाली. पुढे मार्गक्रमण करून छत्रपती शिवाजी महाराज चौकात या रॅलीचे रूपांतर जाहीर सभेत झाले. या वेळी व्यासपीठावर कोकण
धर्म जागरण सहसंयोजक राजेश कुंटे, विनायक चितळे, बजरंग दलाचे महाराष्ट्र व गोवा प्रांत अध्यक्ष अ‍ॅड. दीपक गायकवाड हेही उपस्थित होते.
सीएए देशहितासाठी कसा आवश्यक आहे हे कोकण धर्म प्रसारक संयोजक राजेंडे कुंटे यांनी आपल्या मनोगतातून सांगितले. अ‍ॅड. गायकवाड यांनीही विचार मांडले.
कर्जतचे उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, भाजप किसान मोर्चा प्रदेश सचिव सुनील गोगटे, भाजप जिल्हा चिटणीस रमेश मुंढे, उपाध्यक्ष वसंत भोईर, कोकण धर्म प्रसारक जिल्हा अध्यक्ष साईनाथ श्रीखंडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे, कर्जत पंचायत समितीचे नरेश मसणे, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष कल्पना दास्ताने, नेरळचे माजी उपसरपंच बल्लाळ जोशी, कर्जत सहकारी सोसायटी अध्यक्ष अरुण धारप, विश्व हिंदू परिषद प्रखंड मंत्री विशाल जोशी, भारतीय मजदूर संघाचे प्रदेश सचिव अ‍ॅड. अनिल ढुमणे आदींसह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.

Check Also

सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक

प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …

Leave a Reply