पनवेल ः रामप्रहर वृत्त
लेखक ज्ञानेश महाराव यांनी वाशी येथे आयोजित संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनात प्रभू श्री राम आणि श्री स्वामी समर्थ यांच्यावर अश्लाघ्य टीका केली होती. सर्व स्तरातून याचा निषेध केला जातोय. पनवेलमध्येही हिंदू संघटनांच्या वतीने गुरुवारी (दि. 12) निषेध आंदोलन करण्यात आले.
पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर झालेल्या या निषेध आंदोलनाला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, शिवसेनेचे पनवेल शहर जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, युवा नेते प्रथमेश सोमण, भाजप शहर अध्यक्ष अनिल भगत, जिल्हा चिटणीस रमेश मुंडे, हिंदवी सेनेचे पनवेल शाखा संस्थापक निलेश पाटील, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, बजरंग दलाचे गुरूनाथ मुंबईकर, विश्व हिंदू परिषदेचे अमोल साखरे, माजी नगरसेवक विकास घरत तसेच संजय भगत, के.सी. पाटील, पनवेल शहर सरचिटणीस अमित ओझे, उपाध्यक्ष केदार भगत, विनायक मुंबईकर, रूपेश नागवेकर, चिन्मय समेळ, देवांशु प्रभाळे, आकाश भाटी यांच्यासह इतर मान्यवर, हिंदू संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाशी येथे 22 ऑगस्टला झालेल्या संभाजी ब्रिगेडच्या राज्यस्तरीय अधिवेशनात ज्ञानेश महाराव यांनी हिंदू धर्मियांचे आराध्य दैवत प्रभू श्रीराम, सीता, लक्ष्मण, उर्मिला तसेच श्री स्वामी समर्थ यांच्याविषयी अवमानकारक, आक्षेपार्ह वक्तव्य करून हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या. विशेषतः या कार्यक्रमाला खासदार शरद पवार आणि खासदार छत्रपती शाहू महाराज उपस्थित होते. या मंडळींच्या समोरच महाराव यांनी ही टीका केली आणि त्यांनी सहनही केली. त्यामुळे सर्व स्तरातून याचाही निषेध करण्यात येत आहे.
हिंदू देवदेवता व संतांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणार्या आणि त्याचे समर्थन करणार्यांचा पनवेलमध्येही जाहीर निषेध करण्यात आला. त्याचप्रमाणे अशा हिंदूद्वेष्ट्यांना अटक करावी या मागणीचे निवेदन पोलिसांना देण्यात आले. राजकारण करत असताना धर्माच्या विषयात हस्तक्षेप करू नये; नाही तर परिणाम उग्र होतील, अशा शब्दात संतप्त कार्यकर्त्यांनी या वेळी इशारा दिला.
Check Also
आगामी निवडणुकीतही आमदार प्रशांत ठाकूर यांना विजयी करा -दयानंद सोपटे
तळोजा ः रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आपण आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर विश्वास …