Breaking News

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेलमध्ये रक्तदान शिबिर उत्साहात

पनवेल ः रामप्रहर वृत्त
देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती या काळात भारतीय जनता पक्षाच्या वतीने विविध सेवाकार्य असलेल्या सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पनवेल तालुका व शहर युवा मोर्चाच्या वतीने पनवेलमध्ये आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन शुक्रवारी (दि. 20) आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरास प्रतिसाद लाभला.
पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या या शिबिराच्या उद्घाटनावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष अनिल भगत, महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, चारुशीला घरत, वृषाली वाघमारे, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, प्रल्हाद केणी, भूपेंद्र पाटील, अमरीश मोकल, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष अमित जाधव, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष आनंद ढवळे, विश्वजीत पाटील, दिनेश खानावकर, महेश पाटील, सुनील पाटील, मयूर कदम, कोमल कोळी, एमजीएम हॉस्पिटलचे डॉ. राजेश तरदे, डॉ. शारदा आंचन यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या दूरदृष्टीतून लोककल्याणकारी विविध योजना अमलात आणून देशाला प्रगतिपथावर आणले. त्याचबरोबर योग्य निर्णय घेऊन देशाला बलशाली बनवले आहे. त्यामुळे आपला भारत हा जगात सामर्थ्यवान देश म्हणून उदयास आला आहे, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी या वेळी केले. त्याचप्रमाणे कोकणात भाजपला मजबूत करण्याचे काम करणारे मंत्री रवींद्र चव्हाण हे ताकदवर नेते आहेत, असेही त्यांनी सांगितले.
देशाच्या सर्वांगीण विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करीत आहेत. प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष त्यानंतर स्वतः या पक्षाच्या ध्येयधोरणाने काम करत असताना शेवटच्या घटकापर्यंत पोहचण्याचे काम होत आहे. साधी राहणी असलेले मंत्री रवींद्र चव्हाण यांनी कोकणात पक्षाला मोठी ताकद दिली. पक्ष संघटना वाढवत असताना त्यांचा लोकसंपर्कही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सर्वसामान्य व्यक्तीची जाण त्यांना आहे. वाढदिवसाला सेलिब्रेशन करण्याऐवजी सामाजिक कार्य करणारा भाजप आहे. त्या अनुषंगाने जास्तीत जास्त समाजसेवा झाली पाहिजे ही विचारसरणी घेऊन पक्ष काम करत आहे, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी म्हटले. या शिबिरात 65 जणांनी रक्तदान करीत प्रतिसाद दिला.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते देवळोली येथे रस्ता कामाचे भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघातील देवळोली गावात आमदार महेश बालदी यांच्या 13 लाख …

Leave a Reply