Breaking News

पनवेल आयटीआयमध्ये संविधान मंदिराचे उद्घाटन

संविधानाचे महत्त्व आपण ओळखले पाहिजे -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्त
न्याय, समता आणि बंधूता हे भारतीय संविधानाचे स्तंभ आहेत. देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. संविधानामुळे आजही आपले स्वातंत्र्य आणि अधिकार अबाधित आहे. याचे महत्त्व आपण ओळखले पाहिजे, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविवारी (दि. 15) केले.
युवकांना कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासन विविध योजना राबवित आहेत. त्यानुसार देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते राज्यातील 424 शाासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) संविधान मंदिराचे आभासी पद्धतीने उद्घाटन झाले. यानिमित्ताने पनवेल येथील आयटीआयमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते संविधान मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाला भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमित जाधव, माजी नगरसेवक तेजस कांडपिळे, विचुंबे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रमोद भिंगारकर, अनंता गायकवाड, किशोर सुरते, संस्थेचे प्राचार्य नितीन चौधरी, उपप्राचार्य विजय टिकोले, प्रा. आकाश ठाकूर, संदीप वेले, गटनिदेशक नितिन देशमुख, अजय मयेकर, प्रभाकर नगरकर यांच्यासह इतर मान्यवर, पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी डॉ. पराग पाटील यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना संविधान आणि आपला अभिमान या विषयावर मार्गदर्शन केले.

Check Also

विमानतळ कार्यरत होण्यापूर्वी दिवंगत लोकनेते दि.बा. पाटीलसाहेबांचे नाव देण्याबाबत कार्यवाही करावी

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय …

Leave a Reply