पनवेल : रामप्रहर वृत्त
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी (दि. 20) पनवेलमध्ये रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
युवा मोर्चाच्या वतीने पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित करण्यात आलेले हे शिबिर सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत होणार आहे. या शिबिरात रक्तदात्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन युवा मोर्चातर्फे करण्यात आले आहे.
Check Also
भिंगारी संघाने जिंकला नमो क्रिकेट चषक
पनवेल : रामप्रहर वृत्तनमो चषक 2025 अंतर्गत खारघर येथे झालेल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत भिंगारी …