Breaking News

सिद्धिविनायक मंदिरात व्हीआयपी व्यक्तींना दर्शन; सीसीटीव्हीत प्रकार कैद

मुंबई ः प्रतिनिधी

कोरोना निर्बंधांमुळे राज्यातील मंदिरे सर्वसामान्यांसाठी बंद असताना मुंबईतील प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात मात्र व्हीआयपी लोकांना बाप्पाचे दर्शन दिले जात आहे. नोंदवही आणि सीसीटीव्ही कॅमेर्‍यातून हा प्रकार समोर आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आणि रुग्णसंख्या कमी झाल्याने जनजीवन जवळपास पूर्ववत झाले आहे. राज्य हळूहळू अनलॉक होत असतानादेखील मंदिरांना लागलेली कुलुपे मात्र उघडली गेलेली नाहीत. मंदिरे उघडण्याची मागणी भाजपने सातत्याने लावून धरली असून सोमवारीच राज्यभरातील मंदिरांपुढे शंखनाद आंदोलन केले. तरीही ठाकरे सरकार कुंभकर्णी अवस्थेत आहे.  सर्वसामान्यांसाठी राज्यातील मंदिरांची दारे बंद असताना प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात मात्र बड्या हस्तींना गणपतीचे दर्शन दिले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे, निर्माती-दिग्दर्शक एकता कपूर यांसारख्या व्हिआयपी लोकांना दर्शन देण्यात आल्याचे पुरावे नोंद वही आणि सीसीटीव्हीमध्ये कैद झालेत. दरम्यान, या प्रकरणासंदर्भात सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष आणि शिवसेना नेते आदेश बांदेकर यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी दूरध्वनीवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तो होऊ शकला नाही.

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply