पनवेल ः रामप्रहर वृत्त
उरण विधानसभा मतदारसंघातील देवळोली गावात आमदार महेश बालदी यांच्या 13 लाख रुपयांच्या निधीतून अंतर्गत रस्त्याचे काम करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते रविवारी (दि. 15) झाले. या वेळी त्यांनी उरण मतदारसंघाचा आमदार महेश बालदी यांच्या पाच वर्षाच्या काळात कायापालट झाला असल्याचे प्रतिपादन केले.
आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्न व पाठपुराव्यामुळे उरण मतदारसंघात अनेक विकासाची कामे मार्गी लागली आहेत. त्यांच्या आमदार निधीतून मतदारसंघात झालेली अनेक कामे पूर्णत्वास येत आहेत, तर अनेक कामे होत आहेत. त्या अनुषंगाने त्यांच्या 13 लाख रुपयांच्या स्थानिक आमदार निधीतून देवळोली येथील अंतर्गत रस्त्याचे काम करण्यात येणार आहे. या कामाचे भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन झाले.
या कार्यक्रमास भाजपचे तालुका सरचिटणीस भूपेंद्र पाटील, उपाध्यक्ष संदीप पाटील, गुळसुंदे विभागीय जि.प. अध्यक्ष डॉ. अविनाश गाताडे, पं.स. विभागीय अध्यक्ष सुनील माळी, मजदूर माथाडी सेलचे अध्यक्ष अनंतशेठ पाटील, सरपंच राजश्री पाटील, माजी सरपंच निलेशा पाटील, काजल पाटील, रामभाऊ पाटील, उमेश पाटील, मंगेश पाटील, भास्कर पाटील, अशोक पाटील, पी.पी. पाटील, विनोद पाटील, मनोज भंडारकर, हरिश्चंद्र पाटील, जयदास पाटील, राजेश पाटील, गजानन बडवी, भगवान कोंडीलकर, सुरेश गव्हाणकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. या कामाबद्दल त्यांनी आभार मानले.
Check Also
आगामी निवडणुकीतही आमदार प्रशांत ठाकूर यांना विजयी करा -दयानंद सोपटे
तळोजा ः रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आपण आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर विश्वास …