Breaking News

पेण तालुका रास्त भाव दुकानदार संघटना आक्रमक

पेण : प्रतिनिधी

तालुक्यातील दादर व सोनखार येथील रास्तभाव दुकानदारांवर गैरविश्वास दाखवून, पुरवठा उपायुक्तांनी त्यांच्या उपजिविकेचे साधन कायमचे बंद केल्याने संतप्त झालेल्या पेण तालुक्यातील रास्तभाव दुकानदारांनी संघटनेचे अध्यक्ष मोहनशेठ वेखंडे व जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र शंकर झिंजे यांच्या नेतृत्वाखाली तालुका पुरवठा अधिकारी शशिकांत वाघमारे यांना घेराव घालून निवेदन दिले. पुरवठा विभागाचे उपाययुक्त शिवाजी कादमाने यांनी पेण तालुक्यातील सोनखार व दादर येथील दुकानदारांवर गैरविश्वास दाखवून त्यांच्या रास्तभाव दुकानांची तपासणी केली व त्यांना नोटीस दिली. या नोटीसीला दुकानदारांनी उत्तर दिले. यानंतर पुरवठा अधिकार्‍यांनी त्यांच्या दुकानांचे परवाने कायमस्वरूपी रद्द केल्याचे आदेश पारित केले. त्यामुळे पेण तालुका रास्तभाव दुकानदार संघटना आक्रमक झाली आहे. संघटनेच्या बैठकीत या कारवाईला सर्वानुमते विरोध करून निषेध करण्यात आला. धान्य वाटप, धान्य भरणा व शासकीय गोडावूनमधून धान्य उतरवून न घेण्याचा व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर पेणचे पुरवठा अधिकारी शशिकांत वाघमारे यांना प्रांत कार्यालयात घेराव घालून निवेदन दिले. संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र झिंजे यांनी सर्व सहकार्‍यांसह उपायुक्त शिवाजी कादमाने यांच्या विरोधात घोषणा देत निषेध नोंदविला.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास …

Leave a Reply