Breaking News

कॅन्सर जागरूकता व तपासणी शिबिरास प्रतिसाद

पनवेल : बातमीदार

जागतिक महिला दिनानिमित्त सीआरपीएफ कॅम्प तळोजा मुंबई, अखिल भारतीय स्त्री रोगतज्ञ संघटना, अखिल महाराष्ट्र स्त्री रोगतज्ञ संघटना, नवी मुंबई स्त्री रोगतज्ञ संघटना, रायगड स्त्री रोगतज्ञ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सीआरपीएफ पोलीस पत्नी, महिला पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांकरिता कर्करोग निदान व जनजागृती शिबिराचे आयोजन सीआरपीएफ तळोजा मुंबई येथे बुधवारी केले होते. या वेळी कॅमांडड ऑफिसर राजेशसर उपस्थित होते.

डॉ. शुभदा नील यांनी मार्गदर्शन केले. शिबिराचा लाभ 100 हून अधिक महिला पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांनी घेतला. शिबिरासाठी डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, हॉस्पिटलस नवी मुंबई पनवेल, आयएससीसीपी, रोटरी क्लब मिलेनियम सिटी नवी मुंबई, रोटरी क्लब न्यू बॉम्बे, सीसाईड रोटरी क्लब नवी मुंबई, गरिमा रोटरी क्लब नवी मुंबई, सनराईझ रोटरी क्लब नवी मुंबई यांनी सहकार्य केले.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply