Breaking News

अबोली महिला रिक्षाचालकांचा सत्कार

पनवेल : वार्ताहर

कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट पनवेल येथील शाखेत महिला दिनाचे औचित्य साधून अबोली महिला रिक्षाचालक तसेच कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या महिला कर्मचार्‍यांचा सन्मान करण्यात आला.

अबोली संघटनेचे संस्थापक, अध्यक्ष संतोष भगत, उपाध्यक्ष शालिनी गुरव, सचिव विलास मोरे, खजिनदार ललिता राउत, सह खजिनदार सुनीता जाधव तसेच संघटनेचे सर्व पदाधिकारी व कोहिनूर टेक्निकलचे रिजनल मॅनेजर विवेक चंदने यांच्या उपस्थितीत पनवेल येथील कोहिनर टेक्निकल इन्स्टिट्यूट येथे अबोली महिला रिक्षाचालकांचा सन्मान करण्यात आला. त्या निमत्ताने त्यांना वेगवेगळ्या कोर्सेसची प्रात्यक्षिके दाखवली गेली व टेक्निकलकोर्सेसचे महत्व सांगण्यात आले. या कार्यक्रमासाठी सुमारे 50 महिलांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या शेवटी रिक्षाचालक महिलांनी आपले अनुभव व्यक्त केले. सर्व महिलांचे आभार मानून त्यांना अल्पोपहार देण्यात आला.

Check Also

पनवेलच्या झोपडपट्टी पुनर्वसनासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांचा पाठपुरावा

मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा आणि त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न …

Leave a Reply