Breaking News

कर्जत नगर परिषदेकडून औषध फवारणी

नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांचा पुढाकार

कर्जत ः बातमीदार : कर्जतमध्ये संचारबंदी कडकपणे राबविली जात असून पोलीस प्रशासनाला नगर परिषद मदत करीत आहे. शहरातील नागरिक संचारबंदीला मदत करीत असताना जनतेला सर्व जीवनावश्यक वस्तू वेळेवर मिळतील, यात कोणत्याही अडचणी येणार नाहीत याची काळजी नगराध्यक्षा सुवर्णा जोशी आणि त्यांचे सहकारी पालिका कार्यालयात येऊन घेत आहेत. दरम्यान, या काळात पालिका परिसर रोगमुक्त करण्यासाठी कीटकनाशक फवारणी केली जात आहे. पालिकेच्या या मोहिमेमुळे कर्जत शहर निर्जंतुक होण्यास मदत झाली असून नगराध्यक्षा जोशी यांच्या या प्रयत्नाचे कौतुक होत आहे.

नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, उपाध्यक्ष अशोक ओसवाल, मुख्याधिकारी पंकज पाटील, अधीक्षक गोसावी हे आरोग्य विभागाच्या सर्व कर्मचार्‍यांना विश्वासात घेऊन परिसर निर्जंतुक करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. कर्जत शहरातील मच्छी मार्केट, बसस्थानक, सर्व सार्वजनिक रिक्षा स्टँड स्वच्छ करून बाजारपेठ, महावीर पेठ आदी भागात औषध आणि धूर फवारणी करण्यात आली. त्याचबरोबर अग्निशमन दलाच्या गाडीच्या प्रेशर पाइपद्वारे संपूर्ण कर्जत रेल्वेस्थानक आणि परिसर पाण्याने धुवून काढण्यात आला.

काही दिवसांसाठी स्वतःला काही बंधने घालून त्यांचे पालन करा. लवकरच आपण सर्व जण आलेल्या संकटावर मात करून ही लढाई जिंकू, असे आवाहन नगराध्यक्षा जोशी यांनी केले आहे.

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply