मुरूड : प्रतिनिधी
मुरूड शहर व ग्रामीण भागाच्या विकासासाठी आतापर्यंत 55कोटी रुपयांचा निधी दिला आहे. विकासाचा आराखडा तयार करा, निधी प्राप्त करून देण्याची जबाबदारी माझी, अशी ग्वाही आमदार महेंद्र दळवी यांनी शुक्रवारी (दि. 22) मुरूड येथे दिली.
मुरूडमधील दत्त मंदिराचे सुशोभीकरण व दत्त मंदिर रस्त्याचे भुमीपूजन शुक्रवारी आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. तालुक्यातील जास्तीतजास्त विकासकामे पूर्ण करण्याचा मानस त्यांनी या वेळी व्यक्त केला.
मुरूडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहा पाटील, नगर परिषदेचे प्रशासक पंकज भुसे, दत्त मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष प्रमोद भायदे, सचिव आदेश दांडेकर, प्रविण बैकर, माजी नगरसेवक संदिप पाटील, माजी नगरसेविका युगा ठाकूर, नौसिन दरोग, मेघाली पाटील, ऋषिकांत डोंगरीकर, शुभांगी करडे, दिनेश मिणमिणे, मनोज कमाने,भाई सुर्वे, विजय पाटील, भरत बेलोसे, अशोक धुमाळ आदिंसह नागरिक या वेळी उपस्थित होते.
या वेळी मुरूड शहरातील सिध्दी मोहल्ला रस्ता, दत्त मंदिर रस्ता व दत्त मंदिर सुशोभीकरण, लक्ष्मीखार रस्ता व गटारे, भोगेश्वर पाखाडी रस्ता व गटार, नगर परिषद शाळा नुतनीकरण व डिजीटलायझेशन, नेताजी सुभाषचंद्र बोस आळी रस्ता, कोळीवाडा बोट हाऊस शौचालय आदि विकासकामांचे भुमीपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.