Breaking News

शुक्रवारपासून रसायनी युथ फेस्टिव्हल कला, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

रसायनी : रामप्रहर वृत्त
आमदार महेश बालदी मित्र मंडळ रसायनी विभागाच्या वतीने 5 ते 14 जानेवारीपर्यंत मोहोपाडा येथील भव्य मैदानावर रसायनी कला, क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव अर्थात रसायनी युथ फेस्टिव्हल 2024चे आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवाचे उद्घाटन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते 5 जानेवारीला सायंकाळी 5 वाजता होणार आहे. या महोत्सवाच्या अनुषंगाने विविध कला, क्रीडा व सांस्कृतिक अशा भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी दर्शकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.
5 जानेवारीला आमदार श्री 2024 शरीरसौष्ठव स्पर्धा, 6 जानेवारीला दर्या आमची दौलत हे आगरी कोळी नृत्य, 7 जानेवारीला भोजपुरी व हिंदी नृत्य, 8 जानेवारीला ’महाराष्ट्राची लोकधारा’, 9 जानेवारीला हळदी कुंकू व चला जिंकूया पैठणी कार्यक्रम, 10 जानेवारीला ’बेबी अँन्ड मास्टर रसायनी’, 11 जानेवारीला लावणी शो, 12 जानेवारीला रसायनी आयडॉल गायन स्पर्धा, 13 जानेवारीला नृत्य स्पर्धा, तर 14 जानेवारीला समारोपाच्या दिवशी मिस अ‍ॅण्ड मास्टर रसायनी फॅशन शो असे विविध कार्यक्रम होणार आहेत.
अधिक माहितीसाठी संदीप म्हात्रे (7738137037), पल्लवी दाते (9183165676), साजन जाधव (9175802466) किंवा प्रमोद कनोजिया (8600409439) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Check Also

गणेशोत्सवानिमित्त सोमवारी शिवाजीनगर येथे श्री सत्यनारायण महापूजा व महाप्रसादाचे आयोजन

पनवेल : रामप्रहर वृत्त गणेश उत्सवानिमित्त सोमवारी (दि. 9) शिवाजीनगर येथे माजी खासदार लोकनेते रामशेठ …

Leave a Reply