Breaking News

जसखार ग्रामपंचायतीच्या वतीने मास्क, सॅनिटायझर, डस्टबिन वाटप

उरण : वार्ताहर – उरण तालुक्यातील जसखार ग्रामपंचायतीच्या वतीने शुक्रवारी (दि. 27) गावात स्वच्छता व गावातील ग्रामस्थांचे आरोग्य यांचे संरक्षण होण्यासाठी ग्रामपंचायत हद्दीतील सर्व घरांना मास्क, सॅनिटायझर, डस्टबिनचे वाटप सरपंच दामुशेठ घरत व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

या वेळी पंचायत समिती सदस्य दीपक ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते तथा कामगार नेते अमित ठाकूर समवेत इतर अनेक सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करणार्‍या ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभागी होऊन ग्रामस्थांना स्वच्छतेची महत्व समजावले व संपूर्ण जगभरात चालू असलेल्या कोरोना संसर्ग विषयी घेतल्या जाणार्‍या उपाययोजना व कुटुंबातील सर्व सदस्यांना त्यांच्या पासून संरक्षण करण्याच्या उपाययोजना याविषयी माहिती देण्यात आली. तसेच सर्व ग्रामस्थांनी सरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचे आभार मानून दिलेल्या सूचनांचे कडेकोट पालन करू अशी ग्वाही सरपंच यांना दिली.

जसखार गावावर कोणत्याही प्रकारचे संकट आल्यास ग्रामपंचायत सरपंच व सर्व सदस्य ग्रामस्थांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहेत. तसेच आपले आमदार महेश बालदी व जेएनपीटी प्रशासनाने सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन जसखार ग्रामपंचायतीला दिले आहे.

– दामुशेठ घरत, सरपंच, जसखार ग्रामपंचायत

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply