Breaking News

व्यापारी असोसिएशनकडून कळंबोलीत गरिबांना धान्य

कळंबोली : प्रतिनिधी  – करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या घोषणेमुळे कळंबोली परिसरातील रस्त्यावरील भिकारी, मानसिक रुग्ण व गावाकडे जाण्यासाठी निघालेल्या लोकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. याची माहिती मिळताच कळंबोली व्यापारी असोसिएशनने कळंबोली पोलीस ठाण्यामार्फत धान्याचे वाटप करण्यात आले.

हे नागरिक मुख्यत्वे रस्ते, मंदिराबाहेर किंवा मोकळ्या मैदानांचा आसरा घेत असतात व आहेत. त्यांना इतर नागरिक घरातील उरलेले अन्न किंवा हॉटेलमधील उरलेले पदार्थ दिले जातात. मात्र मागील तीन-चार दिवसांपासून लॉकडाऊन केल्याने  त्यांचे हाल होत आहेत. असा लोकांची जेवणाची सोय व्हावी म्हणून कळंबोली व्यापारी असोसिएशननेच्या वतीने 70 किलो तांदुळ, 70 किलो डाल, 70 किलो आटा, 100 किलो आलू आणि 10 किलो कांदे कळंबोली पोलीस ठाण्यात देण्यात आले.

या वेळी संघटनेचे अध्यक्ष कमळ कोठारी, सदस्य पवण जैन, बुद्धराज, लालाराम, अमित सोलंकर, अजय सुर्यवंशी आदींसह पोलीस अधिकारी उपस्थित होते.

Check Also

वायू-जलप्रदूषण रोखण्यासाठी राज्यस्तरीय समिती; आमदार प्रशांत ठाकूर यांचा समावेश

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्यातील वायू व जलप्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांकडून घेतली जाणारी …

Leave a Reply