Breaking News

पनवेलमध्ये नाका कामगारांसह गोरगरिबांना फूड पॅकेट्सची व्यवस्था

पनवेल : वार्ताहर  – पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या सहकार्याने व अनेक स्वयंसेवी संस्था/ व्यक्ति यांच्या मदतीने शुक्रवारी परिसरातील अनेक नाका कामगार व गरजूंना फुड पॅकेट्सचे वाटप करण्यात आले.

आज साजिद नावडेकर व धिरूभाई लिबानी यांनी दिलेले 800 फुड पॅकेट हद्दीतील गरजु, बेघर, कामगार, वॉचमन, मजुर, रिक्षा, टॅक्सी चालक व बस डेपोमधील चालक, वाहक यांना पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी, पोलीस निरीक्षक विजय तायडे व पोलीस कर्मचारी यांनी वाटप केले. पनवेल पोलीस ठाण्याकडून अशाप्रकारे इतर स्वयंसेवी संस्था/ व्यक्ति यांना देखील संपर्क करून दररोज गरजूंना फुड पॅकेट्स वाटप केले जाणार आहे.

Check Also

वाढवण बंदर बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात बैठक आमदार महेश बालदी यांची प्रधान सचिव लोकेश चंद्रा …

Leave a Reply