![](https://ramprahar.com/wp-content/uploads/2020/04/Kadav1-1024x768.jpg)
कडाव ः प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्जतमधील किरवली ग्रुप ग्रामपंचायतीकडून ग्रामपंचायत हद्दीतील गोरगरीब व गरजू आदिवासी बांधवांना धान्यवाटप करण्यात आले. ग्रामपंचायतीने पुढाकार घेत 15 टक्के मागासवर्गीय निधीतून किरवली ग्रामपंचायतमधील आदिवासी बांधवांना किराणा मालाचे वाटप करताना सोशल डिस्टन्सिंगचे तंतोतंत पालन करण्यात आले. या वेळी माजी सभापती तथा कर्जत पंचायत समितीचे सदस्य प्रदीप ठाकरे, तंटामुक्ती अध्यक्ष संदीप बडेकर, ग्रामपंचायत सरपंच संतोष सांबरी, माजी उपसरपंच तथा सदस्य बिपीन बडेकर, उपरपंच निशा साळोखे, सदस्य हिरामण गायकवाड, दर्शन करनुक, चित्रा पारधी, श्रद्धा शेळके, ग्रामविकास अधिकारी एस. पी. पाटील आदी उपस्थित होते.