कळंबोली : प्रतिनिधी – खांदा कॉलनी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सांस्कृतिक मंडळानी यंदाची आंबेडकर जयंती साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेत परिसरात सामाजिक उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनतेची सेवा करताना आपला जीव धोक्यात घालणार्या आरोग्य रक्षक, सफाई कामगार, पोलीस यांना मास्कचे वाटप केले आहे. खांदा कॉलनी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सांस्कृतिक मंडळाने सामाजिक बांधीलकीतून ‘एक हात मदतीचा’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. कोरोना दररोज अनेकांचे बळी घेत सुसाट सुटला आहे. असा महामारीत जनतेची सेवा करताना आपला जीव धोक्यात घालणार्या आरोग्य रक्षक सफाई कामगार, कठिण परिस्थितीत आपली जबाबदारी कर्तव्य पार पाडणार्या पोलीस बांधव, अबोली महिला रिक्षा चालक यांना सोशल डिस्टन्सिंग ठेवून शुक्रवारी (दि. 10) मास्कचे वाटप करण्यात आले. या वेळी मंडळाचे पदाधिकारी श्याम लगाडे, महादेव वाघमारे महेंद्र कांबळे, संदीप भालेराव, रमेश गायकवाड, अनिकेत भंडारे आदी उपस्थित होते.
Check Also
शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित
पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …