पनवेल : रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्षाच्या विकासकामांवर प्रभावित होऊन मोहागाव तरघर येथील शेकापचे मच्छिंद्र कोळी यांनी रविवारी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्याचे पक्षात स्वागत केले. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी, तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, पनवेल तालुका महिला मोर्चाच्या अध्यक्षा रत्नप्रभा घरत, शैलेश भगत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.