Breaking News

वेश्वी ग्रामपंचायतीकडून सॅनिटायझरची फवारणी

उरण : वार्ताहर – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उरण पंचायत समितीच्या वतीने गुरुवारी (दि. 9) ग्रुप ग्रामपंचायत वेश्वी, वेश्वी कातकरीवाडी, दादरपाडा येथे सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली. गावकर्‍यांनी सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले.

या वेळी उरण पंचायत समितीच्या सदस्या दिशा प्रसाद पाटील, वेश्वी ग्रामपंचायत सरपंच नरेंद्र शंकर मुंबईकर, ग्रामपंचायत सदस्य अजित वसंत पाटील, सदस्य विलास नारायण पाटील, ग्रामसेवका सरोज मिलिंद पाटील, विंधणे गावचे उदयोजक (गंपूशेठ) तथा भाजप उरण तालुका सरचिटणीस प्रसाद रामचंद्र पाटील व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

आपल्या गावाचे आरोग्य चांगले राहावे या करिता वेळो-वेळी सफाई केली जाते, स्वच्छ गावं, सुंदर गावं, निरोगी गावं अशी आमची संकल्पना असून त्याप्रमाणे करण्यासाठी सरपंच, उपसरपंच सदस्य ग्रामसेविकाप्रयत्न करीत आहोत, अशी प्रतिक्रिया वेश्वी ग्रामपंचायत सरपंच नरेंद्र शंकर मुंबईकर यांनी दिली.

Check Also

पनवेलच्या झोपडपट्टी पुनर्वसनासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांचा पाठपुरावा

मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा आणि त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न …

Leave a Reply