मुंबई : प्रतिनिधी
परराज्यातील मजूर आणि कामगांराना त्यांच्या राज्यात परत पाठवत असतानाच, आपल्या महाराष्ट्रातील मुंबई, पुणेसारख्या शहरांमध्ये कामानिमित्त आलेल्यांवर मात्र अन्याय होत आहोत. विदर्भ, कोकण, मराठवाडा, खान्देश, पश्चिम महाराष्ट्रातील विशेषतः कोल्हापूर, सांगली, सातारा या पट्ट्यातील; तसेच कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यांतील श्रमिक, चाकरमान्यांना त्यांच्या मूळ गावी मोफत पाठवण्याची व्यवस्था करा, अशी मागणी भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली.
राज्यात जिल्ह्यांच्या सीमा बंद करण्यात आल्याने राज्यांतंर्गत अनेक श्रमिक, कामगार अडकून पडले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या सूचनांप्रमाणे आरोग्य तपासणी करून अशा श्रमिकांना तातडीने त्यांच्या मूळ गावी सोडल्यास त्यांची होणारी कुचंबणा व गैरसाय कमी होईल. यातील अनेक श्रमिक, मजूर हे जिल्ह्यांच्या सीमांवर अडकून पडले आहेत. त्यामुळे त्यांच्या अन्नपाण्याच्या सुविधेसह आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे, याकडे आमदार आशिष शेलार यांनी लक्ष वेधले आहे. ही बाब लक्षात घेऊन सरकारने तातडीने याबाबत पावले उचलावीत, असेही त्यांनी नमूद केले आहे.
Check Also
‘नैना’साठी शेतकर्यांच्या घरांवर कोणतीही तोडक कारवाई करू नका
आमदार महेश बालदी यांची हिवाळी अधिवेशनात मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तिसर्या मुंबईच्या अनुषंगाने नैना …