पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महापालिका क्षेत्रात पाच आणि ग्रामीण भागात तीन असे तालुक्यात एकूण आठ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. यात मनपा हद्दीत कामोठ्यातील दोन आणि कळंबोली, तळोजा व नवीन पनवेल येथील प्रत्येकी एक, तर ग्रामीणमध्ये पाली देवद (सुकापूर), उलवे नोड व करंजाडे येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे मंगळवारी (दि. 5) कोरोनाचे महापालिका क्षेत्रात 107 रुग्ण व तालुक्यात 134 रुग्ण झाले असून, रायगड जिल्ह्यातील अलिबागमधील रुग्ण धरून हा आकडा 155वर पोहोचला आहे.
कामोठे सेक्टर 35 येथील संकल्प सोसायटीतील 58 वर्षीय व्यक्ती मुंबईला धारावी बस डेपोत आणि सेक्टर 6 शीतलधारा कॉम्प्लेक्समधील 52 वर्षीय व्यक्ती वडाळा बस डेपोत चालक आहे. या दोघांना कामाच्या ठिकाणी संसर्ग झाला आहे. नवीन पनवेल से. 4 मधील पुष्पलता सोसायटीतील 65 वर्षीय महिलेचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. त्यांच्या वडाळा पोलीस ठाण्यातील कर्मचारी व घरातील तीन व्यक्तींना यापूर्वी कोरोनाची लागण झाली आहे. कळंबोली से. 4 ई मधील 57 वर्षीय महिलेला कोरोना झाला असून, ती महिला कॅन्सरवर उपचार घेण्यासाठी टाटा हॉस्पिटलमध्ये गेली होती. तळोजा पानचंद से. 9मधील 28 वर्षीय महिला वडाळा पोलीस ठाण्यात कार्यरत आहे तिला कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आतापर्यंत पनवेल महापालिका हद्दीतील 1166 जणांची टेस्ट केली गेली आहे. त्यापैकी 22 जणांचे रिपोर्ट अद्याप मिळालेले नाहीत. कोरोना पॉझिटीव्हपैकी 66 जणांवर उपचार सुरू असून, 39 जण बरे झाल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे, तर दोघांचा मृत्यू झालेला आहे.
पनवेल ग्रामीणमध्ये मंगळवारी तीन नवीन रुग्ण आढळले. त्यापैकी एक करंजाडे सेक्टर 4 येथील मिताली होममधील पोलीस कर्मचारी आहे. याशिवाय उलवे सेक्टर 23 येथील एपीएमसी मार्केटमध्ये काम करणार्या व्यक्तीचा आणि सुकापूर येथील साक्षी पार्क 2मधील 40 वर्षीय महिलेचा ही रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. तिच्या पतीला यापूर्वी कोरोनाची बाधा झालेली आहे आतापर्यंत ग्रामीणमध्ये 27 कोरोना रुग्ण झाले आहेत.
Check Also
कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …