Breaking News

सीकेटीतील विद्यार्थ्यांचे उज्ज्वल यश

पनवेल : रामप्रहर वृत्त

हिंदुस्थान टाईम्सतर्फे राष्ट्रीय स्तरावरील प्रश्नमंजुषा स्पर्धेत सीकेटी विद्यालय इंग्रजी माध्यमातील चौथीतील दोन विद्यार्थी आराध्य गुरूनाथ शेळके व रचना एस.वाघमारे यांनी जिल्हास्तरावर तसेच आठवीच्या पूजा मिंलीद नामे या विद्यार्थिनीने राज्यस्तरावर स्तरावर यश संपादन केले. याबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या वेळी संस्थेचे कार्यकारी मंडळाचे सदस्य अनिल भगत, पनवेल पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत, शाळेचे मुख्याध्यापक संतोष चव्हाण, प्राथमिक विद्यालयच्या मुख्याध्यापिका निलीमा शिंदे उपस्थित होते.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते मुंबई मराठी पत्रकार संघाच्या नाट्यसंहितेचे पूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तमुंबई मराठी पत्रकार संघातर्फे यंदाच्या ६५व्या राज्य नाट्य स्पर्धेसाठी ‌‘ही परी अस्मानीची‌’ …

Leave a Reply