पनवेल : रामप्रहर वृत्त
ओवा गाव येथील संत गाडगे माहाराज धमार्थ निवास या धर्मशाळेच्या माध्यामतून सुनिल पाटील हे परिसरातील येणार्या अवे कॅन्सर रुग्नांची मनोभावे सेवा करत आहे. त्याअनुसंगाने भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी या धर्मशाळेस भेट देऊन त्यांनी येथील रुग्णांना त्यांच्या हस्ते चादर वाटप करण्यात आले.
तसेच या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी धन्वंतरी आरोग्य दूत सेवा संस्थेच्या माध्यमातून संत गाडगे माहाराज धमार्थ निवास या धर्मशाळेस एक लाख रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले. या वेळी ज्येष्ठ नेते पापा पटेल, पनवेल महापालिकेचे स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, नगरसेवक हरेश केणी, प्रभाग समिती ‘अ’ सभापती अनिता पाटील, खारघर तळोजा युवामोर्चा अध्यक्ष विनोद घरत आदी उपस्थित होते.