Breaking News

पनवेल तालुक्यात महायुतीचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्त

मावळ लोकसभा

मतदारसंघाचे शिवसेना, भाजप आणि रिपाइं युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना विजयी  करण्यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी शिरढोण, तारा, कल्हे, बाधनवाडी आणि आदिवासी विभाग (वड्या) गावोगावी प्रचार करण्यास सुरुवात केली. त्या प्रचाराला सर्वस्तरातून उदंड प्रतिसाद मिळत आहेत.

या प्रचारदौर्‍यात शिवसेना पनवेल तालुकाप्रमुख रघुनाथशेठ पाटील, पनवेल तालुका भाजपचे उपाध्यक्ष संजय टेंबे, पनवेल पंचायत समितीच्या सदस्या तनुजा टेंबे, उपतालुका प्रमुख अशोक थोरवे, केळवणे पंचायत समिती अध्यक्ष हिरामण ठाकूर, विभागप्रमुख भरत घरत, शिरढोण सरपंच साधना कातकरी, दिघाटी सरपंच अमित पाटील, केळवणे सरपंच संदीप घरत, माजी उपसरपंच मंगेश वाकडीकर, शाखाप्रमुख भरत जुमलेदार, केळवणे उपसरपंच भानुदास गावंड, केळवणे ग्रामपंचायतीचे सदस्य सुशिल ठाकूर आदी सहभागी झालेले होते.

तर केळवणे परिसरात झालेल्या प्रचार रॅलीत गाव अध्यक्ष रामचंद्र मोकल, रवींद्र माळी, भाजप बुथ कमिटी सदस्य सुबोध ठाकूर, युवा कार्यकर्ता मच्छिंद्र बा. पाटील, स्वप्नील भोवड, संदेश विश्वासराव, जगदीश जंगम, दत्ता खामकर, दीपक देशमुख, मुबिन मुल्ला, रोहित

धमाल, दीपक कदम, अमोल

जुमलेदार, शिरढोण ग्रामपंचायतीच्या सदस्य, तसेच केळवणे जि. प. विभागातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

खोपोलीत 106 कोटींचे ड्रग्ज जप्त

पोलिसांची कंपनीत कारवाई, त्रिकूट ताब्यात खोपोली, खालापूर : प्रतिनिधी खोपोली पोलिसांनी ढेकू गावच्या हद्दीतील एका …

Leave a Reply