Breaking News

शाळांची प्रवेश प्रक्रिया लांबणीवर; पालकांत संभ्रमाचे वातावरण

पेण ः प्रतिनिधी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचा चौथा टप्पा राज्यात लागू आहे. कोरोनाच्या दहशतीमुळे सरकारी, निमसरकारी व खासगी शाळा-महाविद्यालये या टप्प्यातही उघडणार नसून शाळा नेमकी कधी सुरू होणार याविषयी अनिश्चितता आहे. यामुळे आता पालकांनी ऑनलाइन प्रवेशास पसंती दिल्याचे दिसून येत आहे.

शैक्षणिक वर्ष 2019-20च्या द्वितीय सत्रापूर्वी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा-महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. लॉकडाऊनचा कालावधी वाढल्यानंतर शाळांच्या परीक्षाही रद्द करून सत्र एक व द्वितीय घटक चाचणी गुणांच्या सरासरीवर विद्यार्थ्यांना निकाल देण्यात येऊन सरसकट सर्वांना पुढील वर्गात प्रवेश देण्यात आले आहेत. अनेक शाळा व शिक्षकांनी ’वर्क टू होम’ करीत निकाल तयार करून विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने प्रगतिपत्रके दिली आहेत. मागील शैक्षणिक सत्राची कार्यवाही पूर्ण झाली असली तरी लॉकडाऊनच्या वाढणार्‍या टप्प्यामुळे नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशासंबंधी पालक, शिक्षक व शाळांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून मे महिना संपायला काही दिवस असतानाही प्रवेशासंबंधी पालक अनभिज्ञ आहेत. पुढील शैक्षणिक वर्षाचा प्रवेश कसा होईल यासंबंधी काही कल्पना नसलेले पालक आपल्या पाल्यांच्या नवीन प्रवेशासाठी उत्सुक आहेत. प्रवेशासंबंधी काही संस्था व शाळांनी ऑनलाइन पद्धतीने अभ्यासक्रमही सुरू केला आहे. दरवर्षी 15 जूनच्या आसपास शाळांचे नवीन सत्र सुरू होते, मात्र यावर्षी कोरोनामुळे ते केव्हा सुरू होईल याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

Check Also

तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड

पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …

Leave a Reply