उरण : वार्ताहर, प्रतिनिधी – उरण तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 146 झाली होती. त्यातील 126 बरे आलेले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. वाढत्या रुग्ण संख्येमुळे उरणकरांंच्या चिंतेत आणखीनच भर पडत चालली असतानाच सोमवारी (दि. 25) कोरोनाग्रस्त 51 रुग्णांपैकी 31 रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. फक्त 20 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. तर उरण परिसरात सोमवारी एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला आहेत.
उपचार घेत असलेल्या 20 रुग्णांमध्ये कामोठे एमजीएम रुग्णालयात आठ, पनवेल येथील (कोविड) उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथे नऊ व इंडिया बुल येथे तीन अशी एकूण 20 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण उपचार सुरू असल्याची माहिती उरण तहसिलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.
तसेच करंजा येथील कोरोना पॉझिटीव्ह संख्या 126 झाली होती. त्यातील 116 रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून फक्त 10 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती उरण तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र इटकर यांनी दिली.