Breaking News

राज्यात आमचे नाही तर शिवसेनेचे सरकार

पृथ्वीराज चव्हाण यांचे अजब वक्तव्य

मुंबई : प्रतिनिधी – राज्यात सध्या महाविकास आघाडीचे सरकार आहे, मात्र माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यांची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असल्याने खळबळ माजली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये पृथ्वीराज चव्हाण राज्यात शिवसेनेचे सरकार असल्याचे सांगत आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असतानाही पृथ्वीराज चव्हाण यांनी असे वक्तव्य केल्याने तर्क-वितर्क लढवले जात आहेत. दरम्यान या ऑडिओ क्लिपवर अद्याप पृथ्वीराज चव्हाण यांनी कोणतेही भाष्य केलेले नाही.

स्थानिक भागासाठी निधीच्या अपेक्षेने एका कार्यकर्त्याने पृथ्वीराज चव्हाण यांना फोन केला होता. या वेळी पृथ्वीराज चव्हाण सांगत आहेत की, मी काही आज मंत्रीमंडळात नाही. आमचे सरकार नाही, शिवसेनेचे सरकार आहे. मी शिफारस करेन. पण आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे होईल असे वाटत नाही.

यावर समोरील कार्यकर्ता निधी उपलब्ध आहे. आयुक्तांकडे ट्रान्सफर केला आहे असे सांगतो. त्यावर उत्तर देताना पृथ्वीराज चव्हाण सांगतात की, कोरोनाच्या लढ्यामध्ये निधी सगळा परत घेतला आहे. नव्याने घ्यावे लागेल. परिस्थिती बिकट आहे लोकांची, चार जणांनी आत्महत्या केली आहे असे समोरील कार्यकर्ता सांगतो तेव्हा मी शिफारस करतो सांगितले आहे. मी मंत्रिमंडळात नाही असा पुनरुच्चार पृथ्वीराज चव्हाण करतात.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply