मुंबई : प्रतिनिधी
आफ्रिकेतून निघालेली टोळधाड येमेन, इराण, पाकिस्तानमार्गे भारतात पोहोचली. देशातील अनेक राज्यांत पिकांचे नुकसान करणारे हे कीटक आता मुंबईत दाखल झाले आहेत. विक्रोळी, ताडदेव, वरळी भागात मोठ्या संख्येने टोळ दृष्टीस पडल्याचा दावा करण्यात येत आहे.
गेल्या 27 वर्षांमधील सर्वांत मोठे टोळ संकट राज्यात आले आहे. विदर्भातील अमरावती, नागपूर, वर्धा या तीन जिल्ह्यांना टोळधाडीचा फटका बसला आहे. नागपूरच्या काटोल आणि अमरावतीच्या मोर्शी, वरूडमध्ये टोळांची संख्या खूप जास्त होती. या टोळांनी तीन दिवसांत 120 किलोमीटर अंतर कापत विदर्भात शिरकाव केला.
मुंबईत विक्रोळीत मोठ्या संख्येने टोळ आल्याचे व्हायरल होत आहेत. दक्षिण मुंबईतील ताडदेव, वरळीतही त्यांनी हजेरी लावली, तर गोरेगावमध्ये तुरळक टोळ आढळले, मात्र ही अफवा असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे.
Check Also
शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित
पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …