कर्जत : बातमीदार
कर्जत तालुक्यात कोरोनाचे आणखी रुग्ण वाढू नयेत यासाठी खबरदारी म्हणून 28 ते 30 मे या कालावधीत कर्जत आणि नेरळ बाजारपेठ बंद राहणार आहे. नगर परिषद आणि ग्रामपंचायतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत दोन्ही प्रमुख शहरांतील सर्व व्यवहार ठप्प असून, कडकडीत बंद पाळला जात आहे.
कर्जत तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या 20 झाली आहे. त्यातील दोन रुग्ण मयत झाले आहेत, तर तीन रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, उर्वरित 15 रुग्णांवर वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. कर्जत तालुक्यात सध्या जे 15 रुग्ण आहेत, त्यातील 11 रुग्ण हे बाहेरून आलेले किंवा बाहेर जा-ये करणारे आहेत, तर चार रुग्ण कोरोनागस्तांच्या संपर्कात आल्याने पॉझिटिव्ह आले आहेत.
कोरोनाचा आणखी संसर्ग होऊ नये यासाठी कर्जत नगर परिषद आणि नेरळ ग्रामपंचायत यांनी त्या त्या शहरांतील व्यापार्यांना बाजारपेठ बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. या आवाहनानुसार 28 ते 30 मेपर्यंत या दोन्ही शहरांतील मेडिकल वगळता अन्य व्यवहार बंद ठेवण्यात येत आहेत. यापूर्वीही कोरोनाची साखळी तोडण्यासाठी तालुक्यातील बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या होत्या, तर 17 मार्च ासून माथेरानची बाजारपेठ आणि पर्यटनस्थळ बंद आहे.
Check Also
शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव
पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …