Breaking News

बारावीच्या परीक्षेचा बुधवारी निकाल; विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये उत्सुकता

मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी (दि. 8) जाहीर होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांची उत्सुकता वाढली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या. यंदा परीक्षेदरम्यानचा गोंधळ टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या कोविड सुरक्षिततेचा विचार करून शाळा तिथे केंद्र ही सुविधा शिक्षण मंडळाकडून लागू केली होती. परीक्षेनंतर पेपर तपासणीचे कामही व्यवस्थितपणे पार पडले. त्यामुळे निकाल कधी लागणार याची उत्सुकता विद्यार्थ्यांना होती.
इथे आणि असा पहा निकाल
बारावीच्या परीक्षेचा निकाल दुपारी 1 वाजता लागणार असून तो in, mahresult.nic.in, hscresult.mkcl.org, msbshse.co.in या संकेतस्थळांवर बघायला मिळणार आहे. निकाल पाहण्यासाठी परीक्षेचा सीट किंवा रोल नंबर आणि आईचे नाव टाकणे आवश्यक असणार आहे. सीट नंबर चुकला असेल, तर आईच्या नावाने निकाल पाहता येणार आहे.

Check Also

खांदा कॉलनीतील ‘उबाठा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती सुरूच …

Leave a Reply