Breaking News

पनवेल तालुक्यात कोरोनाचे 21 नवीन रुग्ण

पनवेल : प्रतिनिधी  – पनवेल तालुक्यात सोमवारी (दि. 1) कोरोनाचे 21 नवीन रुग्ण आढळले असून 12 जणांनी कोरोनावर मात केली आहे आज महापालिका क्षेत्रात 16 नवीन रुग्ण सापडले आहेत. यामध्ये कामोठे मध्ये 200 रुग्णांचा टप्पा पार तर खारघरमध्ये 117 रुग्ण,  नवीन पनवेल 81  आणि कळंबोलीमध्ये 93 रुग्ण झाले आहेत. पनवेल तालुक्यात सोमवारपर्यंत कोरोनाचे  750  रुग्ण झाले असून 461  जणांनी कोरोनावर मात केली आहे. 31 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला

पनवेल महापालिका क्षेत्रात सोमवारी 16 नवीन रुग्ण आढळले आहेत. कामोठे येथे 11 नवीन रुग्ण आढळल्याने कामोठयातील रुग्णांची संख्या 209 झाली आहे कामोठ्यात सेक्टर 22 मधील एकाच कुटुंबातील चार व्यक्ती आणि सेक्टर 9 संग्राम अपार्टमेंट मधील एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींचा समावेश आहे. याशिवाय सेक्टर 7 स्वस्तिक मीरा, 21 मधील त्रिशूल अपार्टमेंट, सेक्टर 7 मधील शुभांगण कॉम्प्लेक्स आणि वर्धमान सोसायटीतील एका व्यक्तिला कोरोंनाची लागण झाली आहे. नवीन पनवेलमध्ये 2 नवीन रुग्ण सापडल्याने तेथील रुग्णांची संख्या 81  झाली आहे. सेक्टर 15  ए मधील हेरंब सोसायटील एक महिला आणि ए टाईप मधील 26 वर्षीय व्यक्तिला कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

खारघरमध्ये 2 नवीन रुग्ण सापडल्याने तेथील रुग्णांची  संख्या 117   झाली आहे. सेक्टर 6 शहा आर्केड 50 वर्षीय महिला आणि सेक्टर 8 शांतिनिकेतन मधील 34 वर्षीय महिलेला कोरोंनाचा संसर्ग झाला आहे. कळंबोली रोडपाली येथील आदिवासी चाळीतील एका महिलेला कोरोंनाचा संसर्ग झाला आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात आज पर्यंत 2962  टेस्ट करण्यात आल्या 542  जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून 107 जणांचे रिपोर्ट येणे बाकी आहेत. 327 रुग्ण बरे झाले असून 193 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 22 जणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 60.33 टक्के आहे     

पनवेल ग्रामीणमध्ये सोमवारी पाच नवीन रुग्ण सापडले असून तिघांनी कोरोंनावर मात केली आहे  विचुंबे येथील ओम साई घरकुल मधील 18, 16 आणि 13 वर्षीय मुलींचा समावेश आहे. त्यांना त्यांच्या घरातील व्यक्तींपासून संसर्ग झाला आहे. उलवे मापाले यूएसडी येथील 65 वर्षीय व्यक्ती आणि आरएमएम अथेना सेक्टर 19 मधील 29 वर्षीय व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. पनवेल तालुक्यात सोमवारपर्यंत कोरोनाचे 750   रुग्ण झाले असून 461 जणांनी कोरोनावर मात केली आहे. 31 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

नवी मुंबईत 80 जणांना कोरोना

नवी मुंबई : नवी मुंबईत सोमवारी 80 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले तर 51 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. दोन जणांचा मृत्यू झाला असून, मृतांची एकूण संख्या 75 झाली आहे. नवी मुंबईत आतापर्यंत एकूण दोन हजार 284 व्यक्ती पॉझिटिव्ह असून बरे होऊन परतलेल्यांची एकूण संख्या एक हजार 397 झाली आहे. त्यामुळे सद्य स्थितीत 812 रुग उपचार घेत आहेत.

 सोमवारी बाधितांची विभागवार आकडेवारी पाहिल्यास बेलापूर 3, नेरुळ 18, वाशी 6, तुर्भे 13, कोपरखैरणे 13, घणसोली 7, ऐरोली 14, दिघा 6 असा विभागवार रुग्णांचा समावेश आहे.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply