उरण : प्रतिनिधी
नवी मुंबई पोलीस दलातील न्हावा-शेवा बंदर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल दामगुडे सेवा निवृत्त झाले आहेत.त्यांना उरण पोलिसांच्या वतीने काल भावपुर्ण निरोप देण्यात आला. याआधी विठ्ठल दामगुडे यांनी पनवेल शहर, उरण पोलीस ठाणे या ठिकाणी पोलीस निरीक्षक म्हणून काम केले आहे.
त्याचबरोबर पोलीस उपनिरीक्षक म्हणून सुद्धा या भागात त्यांनी नोकरी केली. सात्विक व अध्यात्मिक विचारांचे तसेच कर्तव्य निष्ठा आणि प्रामाणिक पोलीस अधिकारी म्हणून त्यांना ओळखले जाते.त्यांनी आपल्या कार्य काळामध्ये सोशल पोलिसिंगवर भर दिला. पोलीस आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यातील दरी कमी करणारा अधिकारी म्हणून विठ्ठल दामगुडे यांच्याकडे कायम पाहिले गेले. गुन्हे अन्वेषण विभागाचीही त्यांच्या नावावर उत्तम कामगिरी आहे. शेवटची दोन वर्षे न्हावा-शेवा बंदर विभागातही सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून विठ्ठल दामगुडे यांनी उत्तमपणे काम केले. त्यामुळे उरण तालुक्याला त्यांची ओळख कायम राहिली आहे.