Breaking News

रोह्याच्या कुंडलिका नदीत बुडून दोन तरुणांचा मृत्यू

धाटाव : प्रतिनिधी

मुंबईहून रोह्यातील बाहे गावी आपल्या मित्राकडे आलेल्या दोन तरुणांचा कुंडलिका नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मुंबईहून 25जण शनिवारी (दि. 20) बाहे गावी सहलीसाठी आले होते. त्यापैकी काही तरुणांना पोहोण्याचा मोह आवरला नाही, मात्र पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने अजिंक्य जयराम साळवी) व प्रणव राजाराम परब (दोघांचेही वय 30, रा. काळाचौकी मुंबई) बुडाले होते. त्यांचे मृतदेह रविवारी (दि. 21) दुपारी रोहा-कोलाड रस्त्यालगत असलेल्या पांडुरंगशास्त्री आठवले विद्यालयाच्या मागील बाजूस कुंडलिका नदीपात्रात आढळले. या घटनेची नोंद रोहे पोलीस ठाण्यात झाली आहे.

Check Also

करिअरविषयक मार्गदर्शन सत्राला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्तसध्या जगात एआय तंत्रज्ञानावर आधारित सर्वाधिक संधी असल्यामुळे विद्यार्थ्यांनी एआयसोबत लवकरच परिचित …

Leave a Reply