Breaking News

खारघरमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी कोविड लसीकरण उपक्रम

पनवेल : वार्ताहर

खारघर तळोजा कॉलनी ज्वेलर्स फ्रेंडच्या माध्यमातून खारघर सेक्टर 26 ते 36 या परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी कोविड लसीकरण उपक्रम आयोजित करण्यात आला होता. ट्रान्सपोर्टची सोय करून खारघर तळोजा कॉलनी वेल्फेअर असोसिएशनने खारघरमधील जी. डी. पोळ फाऊंडेशन यांच्या लसीकरण केंद्रात 65 ज्येष्ठ नागरिकांना कोविड लस देण्यात आली. जी. डी. पोळ फाऊंडेशन या संस्थेच्या खारघर हॉस्पिटलमध्ये, ज्येष्ठ नागरिकांसाठी उत्तम सोय करून सर्वांना त्वरित लस टोचण्याच्या ध्येय ठेवून, सर्व यंत्रणा यादिवशी सज्ज केली होती. हॉस्पिटलमध्ये, लस दिल्यानंतर, ज्येष्ठ नागरिकांना अर्धा तास रिकवरी रूममध्ये ठेवण्यात आले होते व नंतर डॉक्टरांनी सर्व व्यवस्थित असल्याचे खात्री झाल्यानंतरच सर्वांना घरी जाण्याची परवानगी दिली. या कार्यक्रमास, खारघर तळोजा कॉलेज वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष मंगेश रानवडे उपाध्यक्ष इम्तियाज शेख, अंजली गुप्ता व मेघा मलिक आदींनी खूप परिश्रम घेतले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply