मोहोपाडा : रामप्रहर वृत्त
उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी रसायनी-मोहोपाड्यात जाऊन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्रस्त असलेल्या नाभिक समाजातील बांधवांशी संवाद साधला आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. या वेळी त्यांनी नाभिकांना किटचे वाटपही केले.
कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून नाभिक समाजाची सलून बंद आहेत. याबाबत आमदार बालदी यांनी त्यांच्याशी चर्चा केली व त्यांची अडचण लक्षात घेत ड्रेस, हॅण्डग्लोज, मास्क अशा किटचे त्यांना वाटप केले. त्याचप्रमाणे सलून उघडी व्हावी यासाठी प्रशासकीय अधिकार्यांशी चर्चा करतोे, असे सांगितले. याबद्दल त्यांचे रसायनी-मोहोपाड्यातील नाभिक बांधवांनी आभार मानले.
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …