Breaking News

प्रवाशांना घेऊन लालपरी पुन्हा धावली

कर्जत-पनवेल, कर्जत-खोपोली एसटी बससेवेला अखेर प्रारंभ

कर्जत : प्रतिनिधी
जगभर कोरोनाचे संकट पसरले आणि भारतातसुद्धा येऊन थडकले. हे संकट रोखण्यासाठी 22 मार्चला लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे कधी नव्हे ते रेल्वेची चाकेही थांबली आणि त्याचबरोबर सर्वसामान्यांचे हक्काचे वाहन म्हणून ओळखली जाणारी लालपरी म्हणजे एसटीची बससेवासुद्धा बंद करण्यात आली. लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर 79 दिवसांनंतर कर्जत आगारातून प्रवाशांसाठी एसटी बससेवा मंगळवारी (दि. 9) सुरू झाली.
काही दिवसांपूर्वी परप्रांतीय प्रवाशांना त्यांच्या राज्यात नेण्यासाठी एसटी सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती.  त्यानंतर शासनाने राज्यात प्रवाशांसाठी एसटी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मंगळवारी सकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी पहिली कर्जत-खोपोली एसटी बस सुटली. त्यांनतर 7 वाजता कर्जत-पनवेल ही एसटी धावली. प्रत्येक बस निर्जंतुकीकरण करूनच प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज होती. इतकेच नव्हे तर प्रत्येक प्रवाशाच्या हातावर वाहक सॅनिटायझर देऊन एसटीत घेतले गेले. केवळ 22 प्रवाशांनाच बसमध्ये प्रवास करण्याची परवानगी आहे.  

Check Also

आमदार महेश बालदींच्या उपस्थितीत विविध पक्षांतील कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी यांचे सक्षम नेतृत्व मान्य करून व विकासात्मक धोरणावर …

Leave a Reply