Breaking News

तंत्रज्ञानाचा चुकीचा फिंच ठरला बळी

रांची : वृत्तसंस्था

तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर 32 धावांनी विजय मिळवला. विजयासह पाहुण्यांनी मालिकेत 2-1 असे पुनरागमन केले, परंतु या सामन्यात एक नाट्य घडले आणि ऑसी कर्णधार अ‍ॅरॉन फिंचला बाद ठरविताना तंत्रज्ञान चुकीचे ठरले.

या सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. ऑस्ट्रेलियाने धडाकेबाज फलंदाजी करीत भारताला विजयासाठी 314 धावांचे आव्हान दिले होते. सलामीवीर उस्मान ख्वाजाचे शतक (104) आणि कर्णधार अ‍ॅरॉन फिंचची 93 धावांची खेळी याच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 50 षटकांत 5 बाद 313 धावा केल्या. अखेर 93 धावांवर कर्णधार फिंच माघारी परतला. त्याला बाद देताना ‘बॉल ट्रॅकिंग’ तंत्रज्ञानाची

मदत घेण्यात आली, पण चेंडूचा खरा टप्पा आणि या तंत्रज्ञानांतील टप्पा यात तफावत दिसून आली. चेंडू स्टंपच्या रेषेत मध्यभागी पडलेला असतानाही ‘बॉल ट्रॅकिंग’मध्ये चेंडू कडेला टप्पा पडल्याचा दाखवण्यात आला आणि फिंचला बाद देण्यात आले.

Check Also

स्वप्नपूर्ती!

भारताने ट्वेंटी-20 विश्वचषक जिंकून आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या स्पर्धांमधील विजेतेपदाचा दुष्काळ अखेर संपवला. रोहित …

Leave a Reply