पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महापालिका हद्दीतील प्रभाग समिती ‘ड’मधील रस्त्यांच्या कामाचा भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी (दि. 15) शुभारंभ करण्यात आला.
या कार्यक्रमास महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर जगदिश गायकवाड, स्थायी समिती अध्यक्ष प्रवीण पाटील, महिला व बालकल्याण सभापती कुसुम म्हात्रे, प्रभाग समिती ’ड’ अध्यक्ष तेजस कांडपिळे, नगरसेवक संतोष शेट्टी, विक्रांत पाटील, अॅड. मनोज भुजबळ, नितीन पाटील, नगरसेविका दर्शना भोईर, विद्या गायकवाड, हेमलता म्हात्रे, रूचिता लोंढे, भाजप युवा मोर्चाचे पनवेल शहर अध्यक्ष चिन्मय समेळ आदी उपस्थित होते.
या वेळी पनवेल महापालिका वॉर्ड क्रमांक 17मधील सम्राट हॉटेल ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 आणि वॉर्ड क्रमांक 18मधील रत्नाकर खरे रस्त्यांतर्गत स्वा. सावरकर चौक ते अमरधाम टप्प्याच्या काँक्रीटीकरण कामाचे भूमिपूजन झाले.
Check Also
दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार
रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …
RamPrahar – The Panvel Daily Paper