Breaking News

भौतिकशास्त्र विषयाचे आंतरराष्ट्रीय वेबिनार

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभाग आणि आयक्यूएसी विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. या वेबिनारचा मुख्य विषय नॅनोमटेरियल्स फॉर स्मार्ट अ‍ॅण्ड सस्टेनेबल एनर्जी सोल्युशनस असा होता. देश-विदेशातील चार हजारांहून अधिक प्राध्यापकांनी या वेबिनारमध्ये आपला सक्रिय सहभाग नोंदविला.

या आंतरराष्ट्रीय वेबिनारचे बीजभाषक ऑस्ट्रेलिया येथील क्विन्सलॅण्ड युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीचे वरिष्ठ व्याख्याते डॉ. दीपक दुबल हे होते. प्रमुख व्याख्याते म्हणून नागपूर येथील विश्वेश्वराय नॅशनल इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजीचे प्रा. भाऊसाहेब संकपाळ उपस्थित होते.

स्पेनच्या बार्सिलोना येथील इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी सेंटरच्या प्रसिद्ध संशोधक डॉ. मारिया डेल रोकियो रॉडरिगोज-लागूना यासुद्धा या आंतरराष्ट्रीय वेबिनारच्या प्रमुख व्याख्यात्या म्हणून उपस्थित होत्या. या आंतरराष्ट्रीय वेबिनारसाठी दक्षिण कोरिया येथील डॉनगक युनिव्हर्सिटीच्या एनर्जी आणि मटेरियल इंजिनियरिंग विभागातील प्राध्यापक डॉ. निलेश चोदाणकर उपस्थित होते.

वेबिनारच्या शेवटी डॉ. लीना मेश्राम यांनी उपस्थितांचे आभार मानले. हा वेबिनार यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर, भौतिकशास्त्र विभागप्रमुख प्रा. संजय गायकवाड, प्रा. सोपान गोवे, डॉ. गिरीश गुंड, डॉ. लीना मेश्राम यांनी परिश्रम घेतले.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास …

Leave a Reply