पेण ः प्रतिनिधी
मुंबई-गोवा महामार्गावर वडखळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत आमटेम गावाजवळ एका कारने ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून येणार्या कारला धडक दिली. या अपघातात सात जण जखमी झाले आहेत.
रविवारी वॅगन आर कारचालक मुंबई-गोवा महामार्गावर आमटेम गावाच्या हद्दीत आले असता मुंबईकडून येणार्या ईको फोर्ट कारचालकाने त्याची कार ओव्हरटेक करून राँग साइटला जाऊन वॅगन आर कारला धडक देत अपघात केला. या अपघातात संदीप सुर्वे, दत्तप्रसाद घाटे, प्रभाकर दळवी, कल्पना दळवी, सुहास नाईक, प्रतीक राऊळ आणि राजेंद्र राऊळ जखमी झाले असून दोन्ही गाड्यांचेनुकसान झाले आहे. जखमींना उपचारासाठी पेणच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी वडखळ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे
करीत आहेत.