Breaking News

पाटणेश्वरमध्ये आढळला कोरोनाबाधित रुग्ण

पेण ः प्रतिनिधी

पेण तालुक्यातील पाटणेश्वर येथे एक कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या रुग्णाची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती पेणच्या तहसीलदार अरुणा जाधव यांनी दिली. पेण तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये वाढ होत आहे. सुरुवातीच्या लॉकडाऊन काळात जनतेने शासन व प्रशासनाला घरात राहून चांगले सहकार्य केले, परंतु लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर सर्वच आलबेल झाल्याने कोरोनाचा धोका वाढला. त्यानंतरच पेण तालुक्यात कोरोना रुग्णांत वाढ झाली. आतापर्यंत पेण तालुक्यात एकूण 25 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. त्यातील 13 जणांना उपचारानंतर सोडून देण्यात आले. आजघडीला पेणमधील बाधित रुग्णांची संख्या 12 आहे. पाटणेश्वरमधील कोरोना रुग्णाला उपचारासाठी अलिबाग जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

Check Also

तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड

पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …

Leave a Reply