
नवी मुंबई : बातमीदार
नवी मुंबईत सध्या वाढीव वीज बिलाने सर्वच हैराण झाले आहेत. महावितरणने कोणतेही रिडिंग न घेता हे वीज बिल पाठवल्याने नागरिकांना हे बिल भरण्यासाठी पैसे आणायचे कुठून असा प्रश्न पडला आहे. लॉकडाऊन असल्याने महावितरणकडून गेले तीन महिने मीटर रिडींग घेतले गेलेले नाही.
मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे महावितरणला बिल पाठवता न आल्याने महावितरणने थेट ग्राहकांनाच मिटर रीडिंग पाठवण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार अनेकांनी हे मीटर रिडींग महावितरणाच्या अँपवर पाठवलेबतर वेबपोर्टलवर अपलोड केले. त्यांना महावितरणने त्यानुसार वीज बिल अदा केले. मात्र ज्यांनी मीटर रिडींग पाठवले नाही त्यांना लॉकडाऊनच्या कालावधित मीटर रिडींग बंद असल्याने ग्राहकांना सरासरी युनिटचे वीजबील पाठविण्यात आले होते. मात्र ही अव्वाच्या सव्वा बिले पाठवण्यात आल्याने नागरिकांची मात्र चिंता वाढली आहे. त्याबाबत नागरिकांनी तातडीने महावितरण तसेच आपल्या प्रभागातील लोकप्रतिनिधिंशी संपर्क साधून याविषयी तक्रार केली आहे.
एकत्रित बिल आल्यास न घाबरण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे. एप्रिल, मे, जून या लॉकडाऊन काळात स्वत: हुन मिटर रिडींग पाठविणार्या ग्राहकांना प्रत्यक्ष वीजवापरानुसार बिल पाठविण्यात आले आहे. हे वीजबील लॉकडाऊन कालावधीसहित साधारण तीन महिन्यांचे असले तरी संगणकीय प्रणालीद्वारे बिलाची मासिक (3महिने) वापरानुसार विभागणी करून युनिटला दरातिल सवलत (स्लॅब बेनिफीट) देण्यात येत आले आहे.
साधारण मार्च, एप्रिल व मे महिन्यांत जास्त वीज वापरण्यात येते. त्यामुळे वीज बिलाची रक्कम वाढते. मात्र मित्रा रिडींग सध्या होत नसल्याने महावितरणने रिडींग पाठवण्याचे आवाहन केले होते. जाऊन महिन्यापासून रेग्युलर वीज मीटर रिडींग करण्यात येणार आहे. तसेच जर बिलाची रक्कम जास्त वाटत असल्यानं नागरिकांनी आपल्या विभागात असलेल्या महावितरणच्या कार्यालयात दाद मागावी.
-ममता पांडे, जनसंपर्क अधिकारी, महावितरण